काय करायचे-कसे करायचे
(उगम ते संगम/खंदक तळे व खंदक बांधांचे कार्य)
- आपल्या गावाचा शिवाराची पाहणी करून गावाला व शिवाराला उपलब्ध नाल्याची पाहणी करावी.हि पाहणी नाल्याच्या उगमापासून ते नदीपर्यंत म्हणजे संगमापर्यंत करावी.
- नाला बुजलेला आहे, गाळाने भरला आहे, त्यावर उपनाले आहेत काय यांची माहिती घ्यावी, टोपोग्राफीचा अभ्यास करावा.
- आपल्या गावाचा नकाशा घ्यावा (Village Map) त्यावर सदर नाला रेखांकित करावा. प्राधान्याने कोरडे व पाणी उपलब्ध नसलेले क्षेत्र निवडावे.प्रत्येक नाल्याला पाणलोट क्षेत्र उपलब्ध असते त्याचे निरीक्षण करावे.
- या नाल्याचे लांबीनुसार उगम ते संगम मोजमाप करावे व अंतरानुसार त्यावर नविन जुने बांध, बंधारे असल्यास त्यांची नोंद घ्यावी (Chainage नुसार).
- नाल्याचा L सेक्शन सर्वे व क्रॉस सेक्शन सर्वे करावा (नाल्याचे शासकीय हदीचे आत).
- त्यानंतर उगमापासून संगमाचे दिशेने नाल्याचे अतिक्रमण काढणे, नाल्याचे शासकीय हद्दीनुसार दोन्ही बाजूंनी १० ते १५ फुट रस्त्यासाठी जागा सोडून उर्वरित जागेचे रुंदीकरण व खोलीकरण किमान ४ ते ६ मीटर पर्यंत करावे.
- उपलब्ध, अस्तित्वातील बांध बंधाऱ्याची दुरुस्ती करावी, मजबुती करण करावे, आवश्यक तेथे नविन बांध (मातीबांध,ग्याबियन बांध,दगडी बांध,सिमेंट बांध) निर्माण करावे.
- मुख्य नाल्याला येऊन मिळणाऱ्या उनाल्याबाबतही हीच प्रक्रिया केल्यास मुख्य नाल्यात पाणीसाठा व पुनभरण प्रक्रिया वाढती राहील.
- पर्जन्यमान, विहिरीची पातळी, शेतीपिकाबाबत माहिती (नाल्याचे प्रभाव क्षेत्रात) यांच्या नोंदी सर्वेक्षणापासून दर दोन महिन्यांनी घेऊन ठेवाव्या.
- उपलब्ध पाणीसाठे त्यामुळे होणारे फायदे याबाबत सतत देखरेख ठेवावी व पाण्याचा पूर्णतः उपयोग सर्व प्रकारच्या उपयोगांसाठी घ्यावा.
- या नाल्यांचे काठावर गर्द सावली देणारे वृक्षांचे रोपण करावे.
- नाल्यातील उपलब्ध गाळ, रेती, दगड,मुरूम यांच्या वापरातून गावांचे परिसरातील पांधन रस्ते विकसित करावेत.
- नाल्यांच्या काठावर पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त वृक्षलागवड करावी.