पावसाच्या पाण्याचे संवर्धन व साठवण कार्याची आवश्यकता

पाऊस हा पाणी पुरविणारा एकमेव स्त्रोत आहे

आपल्या भागात काही वर्षापूर्वी दरवर्षातून सुमारे ९० ते १०० दिवस पाऊस पडत असे परंतु गेल्या काही वर्षापासून पर्जन्यमान तेव्हडेच असते पण तो पाऊस फक्त ४० ते ५० दिवसात पडतो आहे यामुळे नाल्यातून वाहणारे (नदीपर्यंत) पाणी वेगाने वाहते व सोबत मोठ्या प्रमाणावर नाल्याचा पात्रात गाळ आणते. नाले अतिक्रमणामुळे, गाळ साठल्यामुळे अरुंद व उथळ झालेले आहेत. वेगाने,कमी वेळात व जास्त प्रमाणात पडलेले पावसाचे पाणी उथळ व अरुंद नाल्यात साठवू शकलो नाही त्यामुळे हे पाणी एकतर आजूबाजूच्या शेतात शिरते व नुकसान करते व पुढे वाहून जाऊन नदीत मिळते ज्याचा उपयोग नाल्याचे परिक्षेत्रातील शेतीला,पशूंना,विहिरींना,गावाला होत नाही ते वाया जाते.

पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून आपल्या गावाच्या लगतच्या नाल्याचे जलसंधारण करणे,साठवणुकीसाठी तसेच जलपातळीत वाढ होणे यासाठी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करून आवश्यक ते बांध,बंधारे तयार करून जागोजागी जलसाठे निर्माण करणे गरजेचे आहे व जे सहज शक्य आहे यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीची गरज नाही हे महत्वाचे आहे.

पुरापासून संरक्षण होईल,परिणामी जलसंवर्धन होईल,जलसाठे निर्माण होतील,भूजलपातळीत वाढ,विहिरींना पुनभरण होईल, पाणी वापरता येईल,खरीप,रब्बी,नगदी पीके यात तर वाढ होईलच पण नव्याने जमिनी लागवडीखाली येतील.पशुपालन,भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन मिळेल,नाल्यालगतच्या पाणी पुरवठा विहिरींची पातळी सदैव उत्तम राहून गावाचा पाणी प्रश्न सोपा होईल यात शंका नाही.याबरोबरच बहुमोल पर्यावरणाचे संवर्धनही आहे.

हे कार्य गरजेचे आहे आणि निश्चय केला तर सहज शक्य आहे.